पक्ष उभा करायला अक्कल लागते, फोडायला नाही; शरद पवार यांची फडणवीसांवर टीका

शरद पवार यांची फडणवीसांवर टीका

सध्या विधानसभेच्या प्रचाराला जोर आला आहे. अनेक नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यादरम्यान शरद पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षफोडीवरून जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले शरद पवार?
विधानसभा निवडणूक काळात मी दररोज चार ते पाच सभा घेत आहे. जिकडे जातोय तिकडे भाजपच्या शासनाबद्दल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामाबद्दल लोकांना विचारतो आहे. पण जनता त्यांच्या कामावर नाराज आहे. दोन पक्ष फोडले, असे देवेंद्र फडणवीस जाहीरपणे सांगत आहे. पक्ष उभा करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला नाही अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

नागरिकांना केले आवाहन
राहुरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ शरद पवारांनी ही सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आघाडीचे सरकार करणार असून आघाडीच्या उमेदवारांना बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन लोकांना केले आहे.

Rashtra Sanchar: