पर्यटन व्यवसायामुळे सुधारतेय जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था

जम्मू – काश्मीर हा पृथ्वीवरील स्वर्ग समजला जातो. कोरोना काळामुळे श्रीनगरमधील पर्यटन व्यवसायाला आर्थिक फटका बसला होता. पर्यटन व्यवसाय थंडावला होता. मात्र जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, तसे पर्यटक भारताच्या नंदनवनाकडे वळू लागले आहेत. यंदा मार्च महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या पर्यटकांची संख्या १.८ लाखांवर होती. गेल्या दहा वर्षांतील ही सर्वात मोठी संख्या आहे.

श्रीनगर : काश्मीर पुन्हा पर्यटकांनी गजबजले आहे आणि यापुढेही पर्यटकांचा ओघ कायम राहील, असा विश्वास पर्यटन विभागाने व्यक्त केला आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. ३० जूनपासून सुरू होणारी ही यात्रा ४३ दिवस चालणार आहे. यातून काश्मीर खोर्‍यात धार्मिक पर्यटन पुन्हा खुलणार आहे. येथील सर्व हॉटेल व शिकारे यांचे आगाऊ आरक्षण झालेले आहे.

भारताचे नंदनवन पुन्हा फुलतेय…
काश्मीर हे पर्यटकांसाठी नंदनवन असून, यंदा कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. ३० जूनपासून सुरू होणारी ही यात्रा ४३ दिवस चालणार आहे. यातून काश्मीर खोर्‍यात धार्मिक पर्यटन पुन्हा खुलणार आहे. येथील सर्व हॉटेल व शिकारे यांचे आगाऊ आरक्षण झालेले आहे. मार्चमध्ये एक लाख ७९ हजार ९७० पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली.

मार्चमध्ये एक लाख ७९ हजार ९७० पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली, असे पर्यटन विभागाचे संचालक जी. एन. इटू यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांत तीन लाख पर्यटकांनी नंदनवनाचे सौंदर्य न्याहाळले आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या काश्मीरला दहशतवादी कारवायांचा शापही आहे. त्याचबरोबर राजकीय अस्थिरता, संघर्ष यातून काश्मीर आता सावरत असून पर्यटकांसाठी सज्ज झाले. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिकांना लाभ होईल.

admin: