पिंपरी : महाराष्ट्र महापौर परिषद परिषदेच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणार्या महापालिकांना दरवर्षी पुरस्कार देण्यात येत असतो. यासाठी प्रश्नावलीद्वारे महापालिकांकडून माहिती मागविण्यात येत असते. या कामाचे परीक्षण करून पुरस्कारार्थींची निवड करण्यात येत असते. सन २०१८-१९ या वर्षात विविध महापालिकांनी केलेल्या कामांची माहिती महाराष्ट्र महापौर परिषद आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या वतीने मागविण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेदेखील यात सहभाग घेत आपण केलेल्या कामांची माहिती पाठवली होती. आणि यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पालिकेच्या विकासकामांचे मूल्यमापन :
महापालिकेने केलेल्या विविध ठिकाणच्या आरक्षित भूखंडांचा विकास, पाणीपुरवठ्याचे सुयोग्य नियोजन, मलनिस्सारण योजनांची सर्व भागांत केलेली कामे, घनकचरा व्यवस्थापन, कचर्यापासून खत आणि वीजनिर्मिती, महिला व बालविकास योजना, ज्येष्ठ नागरिक व निराधार व्यक्तींसाठीचे उपक्रम, कौशल्य या सर्वच स्तरांवर चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच या पुरस्कारासाठी पालिकेची निवड करण्यात आली आहे.
महापालिकेचे प्रशासकीय कामकाज, विविध सभांच्या कामकाजाची कार्यपद्धती, अर्थसंकल्पीय नियोजन, राबविलेल्या विविध योजना, उपक्रम, ऑनलाईन सेवा सुविधा, केंद्र आणि राज्य शासनाच्या महानगरपालिकांसाठी असलेल्या योजनाची अंमलबजावणी, विविध ठिकाणच्या आरक्षित भूखंडांचा विकास, पाणीपुरवठ्याचे सुयोग्य नियोजन, मलनिस्सारण योजनांची सर्व भागांत केलेली कामे, घनकचरा व्यवस्थापन, कचर्यापासून खत व वीजनिर्मिती, महिला व बालविकास योजना, ज्येष्ठ नागरिक व निराधार व्यक्तींसाठीचे उपक्रम, कौशल्य विकास योजना, दिव्यांगांसाठी राबविण्यात आलेल्या योजना, स्वच्छता, आरोग्य सुविधा, वैद्यकीय सुविधा आदी विविध स्तरावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
त्यामुळे ब वर्ग महानगरपालिकांच्या गटात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ७५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.