पुण्यातील अशोक आणि संग्राम मोहोळ यांच्या घरी महाराष्ट्र केसरी गदेचं पूजन

पुणे : पुण्यातील अशोक आणि संग्राम मोहोळ यांच्या घरी महाराष्ट्र गदेचं पूजन करण्यात आलं आहे. मोहोळ कुटूंबाकडून दरवर्षी मानाची केसरी गदा दिली जाते. ही गदा पूजन करुन साताऱ्याला पाठवली जाणार आहे. साताऱ्यात महाराष्ट्र राज्य कुस्तागीर परिषद आयोजित आणि जिल्हा तालीम संघ सातारा यांच्या सहकाऱ्याने ६४वी वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२१-२२ पार पडत आहे.

या स्पर्धेचा सातारा शहरातील छत्रपती शाहू संकुल या ठिकाणी आजपासून शुभारंभ होणार आहे. यासाठी ३६ जिल्ह्यातून ४५ संघ आले आहेत. यामध्ये ९०० मल्ल असणार आहेत. आज ४ वाजल्यापसून या स्पर्धेला सुरवात होणार आहे.

Sumitra nalawade: