प्रायोगिक तत्वावर निवड; सर्वाधिक दुचाकी असलेले शहर
भागा वरखडेः राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
पुणेः जगातील इंधनाचे मर्यादित साठे आणि कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यावर सरकारचा भर यामुळे आता पर्यावरणपूरक वाहने वापरण्याकडे कल आहे. भारताला त्याच्या गरजेच्या ८१ टक्के कच्चे तेल आयात करावे लागते. त्यासाठी सुमारे नऊ लाख कोटी रुपये खर्च पडते. परकीय चलनाची बचत आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आता इथेनॉलच्या वापरावर भर देण्याचे केंद्र सरकारचे धोरण असून पुण्यातील शंभर टक्के दुचाक्या इथेनॉलवर चालविण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी संबंधितांना आदेश आले आहेत.