शिर्डी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे आणि शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला काही सूचनाही केल्या. पोलीस दलाची मान खाली जाईल, असं काम पोलिसांनी करू नये, असा सल्ला अजित पवार यांनी शिर्डीत बोलताना दिला आहे.
पोलिसांसाठी ५३५ स्क्वेअर फुटांचे साडेसहा हजार फ्लॅट शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आली नाही. पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे. याबरोबरच पोलीस दलाची मान खाली जाईल असे काम पोलिसा़ंनी करू नये. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.