भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक खेळ खेळले जातात आणि त्यामधील एक महत्त्वाचा आणि मनोरंजक खेळ म्हणजे फुगडी जो आपण गणपती या सणामध्ये महिलांच्या किंवा मुलींच्या मार्फत खेळताना पाहतो. फुगडी खेळताना मुली किंवा महिला क्रॉस पद्धतीने एकमेकींचे हात पकडतात आणि गाणी, उखाणे, कोडी किंवा काही खेळासंबधित वाक्य रचना किंवा फू बाई फू फुगडी फू असे बोलून फुगडी खेळतात.
फुगडी हे महाराष्ट्र आणि गोव्याचे लोकनृत्य आहे जे कोकणातील महिलांनी गणेश चतुर्थी आणि व्रत या हिंदू धार्मिक सणांमध्ये सादर केले जाते. फुगडी ही कला किंवा खेळ वेगवेगळ्या सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सादर केली जाते. दोन महिला किंवा महिलांचा गट गाणी म्हणत किंवा फू बाई फू फुगडी फू असे बोलून असे म्हणत गिरक्या घेतात आणि या गिरक्यांचा वेग वाढवतात आणि त्या गिरक्या घेऊन दमल्या की, फुगडी घालणे बंद करतात.
फुगडी ही सामान्यपणे भाद्रपद महिन्यात खेळली जाते, कारण स्त्रियांना त्यांच्या सामान्य नीरस वेळापत्रकातून तात्पुरती विश्रांती किंवा त्यांचे मनोरंजन व्हावे या उद्देशाने पूर्वी फुगडी हा खेळ खेळला जात होता. ज्यामध्ये स्त्रिया फुगडी घालण्यासाठी नऊवारी साड्या नेसून फुगडी घालत होत्या.
फुगडीची एक विशिष्ट शैली धनगर (मेंढपाळ) महिलांमध्ये पाहायला मिळते. त्या देवीला अर्पण केलेल्या व्रताच्या वेळी देवी महालक्ष्मीसमोर कळशी फुगडी घालतात आणि देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.
फुगडी म्हणजे काय?
फुगडी हा खेळ २, ४, ६ किंवा ८ महिलांच्या किंवा मुलींच्या मध्ये खेळला येतो आणि या खेळामध्ये स्त्रिया किंवा मुली एकमेकीचे हात पकडून उड्या मारत गोल फिरतात.
फुगडी कशी खेळली जाते?
फुगडी हा खेळ खेळताना महिला वर्तुळात किंवा पंक्तींमध्ये विविध प्रकारची रचना करताना गातात आणि नृत्य करतात. या खेळाची सुरुवात ही हिंदू देवतांची पूजा करून केली जाते. फुगडी खेळताना मुली किंवा महिला क्रॉस पद्धतीने एकमेकींचे हात पकडतात आणि गाणी, उखाणे, कोडी किंवा काही खेळासंबंधित वाक्य रचना किंवा फू बाई फू फुगडी फू असे बोलून फुगडी खेळतात. तसेच या खेळाविषयी असे म्हटले जाते की, पूर्वीच्या काळी स्त्रिया फुगडी घालताना फू फू असा तोंडातून आवाज करत होत्या. त्यामुळे या खेळाचे नाव फुगडी असे पडले.
फुगडी या खेळाविषयी अनोखी आणि मनोरंजक तथ्ये :
या खेळाविषयी असे म्हटले जाते की, पूर्वीच्या काळी स्त्रिया फुगडी घालताना फू फू असा तोंडातून आवाज करीत होत्या. त्यामुळे या खेळाचे नाव फुगडी असे पडले. फुगडी हा खेळ खूप पूर्वीच्या काळापासून खेळला जातो आणि या खेळाला महाराष्ट्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या खेळामुळे महाराष्ट्रातील पारंपरिक लोकसंस्कृतीचे दर्शन घडण्यास मदत होते.
दंड फुगडीमध्ये दोन स्त्रिया एकमेकींचे दंड पकडतात आणि फुगडी घालतात, तर एकहाती फुगडीमध्ये दोन स्त्रिया एका हाताने फुगडी घालतात.
तसेच बस फुगडीमध्ये फुगडी घालता घालता बसले जाते. फुगडी ही सामान्यपणे भाद्रपद महिन्यात खेळली जाते, कारण स्त्रियांना त्यांच्या सामान्य नीरस वेळापत्रकातून तात्पुरती विश्रांती किंवा त्यांचे मनोरंजन व्हावे या उद्देशाने पूर्वी फुगडी हा खेळ खेळला जात होता.