पुण्यात गणेशोत्सवासाठी साडेसात हजार पोलीस तैनात…
पुणे : गणेशोत्सव उद्या मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. राज्यात गणेशोत्सव शांतता आणि आनंदाच्या वातावरणात पार पडावा, म्हणून प्रशासनदेखील कामाला लागलं आहे. पुण्यातील महापालिका प्रशासनानं गणेश मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विसर्जन मिरवणूक, रथाच्या देखाव्याची उंची याबाबत पोलिसांनी आणि प्रशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
पुण्यातील गणेशोत्सवांची एक परंपरा असून, दरवर्षी मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो. याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, यंदा पुणे शहरात तीन हजार ५६६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि चार लाख ५४ हजार ६८६ घरगुती गणपतीची संख्या असणार आहे. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा, यासाठी साडेसात हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी यंदा गणेश मंडळांनी किती ढोल-ताशा पथके मिरवणुकीत ठेवावीत, यावर निर्बंध असणार नाही, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, राहुल श्रीरामे, ए. राजा यांची उपस्थिती होती.
पुण्यात बंदोबस्तासाठी बीडीडीडी पथके, क्यूआरटीचे अधिकारी, अंमलदार तैनात करण्यात येणार असून वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे.
पुणे शहरात गणेशोत्सवकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी एकूण १७०९ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा, याकरिता गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समिती, पोलीसमित्र समिती यांच्या आयुक्त, परिमंडळीय पोलीस उपायुक्त, पोलीस स्टेशनस्तरावर एकूण ६९ बैठका घेण्यात आल्या असून गणेशोत्सव मंडळाचे
पान ७ वर