भीमशक्ती-शिवशक्ती संघटनांनी केला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश!

मुंबई : (Bhimshakti-Shivshakti Join Shivsena) एकनाथ शिंदेंनी सेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेला मोठं भगदाड पडलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील भीमशक्ती आणि शिवशक्तीमधून, बहुजन आघाडी, अल्पसंख्यांक मुस्लिम समाज, रिपाई पक्षातील अनेकांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. सोमवारी मातोश्री येथे सर्वांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. 

शिवसेनेसोबत बंडखोरी करून महाराष्ट्रात जे घडलं ते कोणाला पटलेलं नाही. एकनाथ शिंदे यांचं सरकार आहे, ते व्यावहारिक दृष्टीने झालेले सरकार आहे.  उद्धव ठाकरे यांना विनाकारण पाय उतार व्हावं लागलं होतं. त्यासाठी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. ज्या ज्यावेळी उद्धव साहेब आम्हाला आवाज देतील तेव्हा आम्ही त्यांच्या मागे खंभीरपणे उभे राहू, असे भाई कांबळे पक्षप्रवेशावेळी म्हणाले. दसरा मेळावा हा आमचाच होईल असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचेही भाई कांबळे यांनी सांगितलं. 

भीमशक्ती-शिवशक्ती या  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पँथर भाई कांबळे यांच्यासह  50 संघटनेच्या  पदाधिकारी, केंद्रीय महासचिव दलित चळवळीचे अभ्यासक डॉ महेंद्र वानखडे, दलित पँथर तसेच लोकजनशक्ती पार्टीचे श्री किरण माने, मुस्लीम समाजाचे नेते अब्बास  मिर्जा, बहुजन समाजाचे नेते कैलास सिरसाट, आदिवासी समाजाचे नेते लहू काटकर, सेवा निवृत्त सनदी अधिकारी तथा भीमशक्ती-शिवशक्तीच्या संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Prakash Harale: