मी गांधींबद्दल केलेल्या वक्तव्याचा मला काहीच पश्चाताप नाही… कालीचरण महाराजाचं पुन्हा वादग्रस्त विधान

भोपाळ : महात्मा गांधींवर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या कालीचरण महाराजाला जामिन मिळाला असून तो तुरूंगातून बाहेर आला आहे. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर कालीचरण महाराजाचं त्याच्या समर्थकांनी विमानतळावर भव्य स्वागत केलं. यावेळी कालीचरण महाराजाने महात्मा गांधींबद्दल आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मध्यप्रदेशातील इंदूर विमानतळावर कालीचरण महाराजाचे त्याच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केले. त्यांनतर माध्यमांशी बोलत असताना एका पत्रकाराने त्याला विचारले की, तुम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी केली होती, त्याबद्दल तुम्हाला खेद वाटतो का? यावर प्रत्युत्तर देताना कालीचरण महाराज म्हणाला की नाही, मला माझ्या वक्तव्याचा काहीच पश्चाताप नाही. कलियुगात सत्य बोलल्याबद्दल मला शिक्षा झाली आहे.

Sumitra nalawade: