नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय पक्षा’च्या दर्जाबाबतचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आज आयोग आज सुनावणी घेणार आहे. यावेळी काय निकाल येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाबाबत फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाची अट पूर्ण करत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार का? असा सवाल उपस्थित आहे.
एखाद्या राजकीय पक्षाला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये किमान 6 टक्के मते मिळाल्यास तो “राष्ट्रीय पक्ष” म्हणून ओळखला जातो. याशिवाय त्या पक्षाला लोकसभेच्या किमान चार जागा जिंकाणे आवश्यक असते.