राऊत- राणा भेटीचा नवनीत राणांकडून खुलासा

दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकारनात शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यात जोरदार टीका टिपणी पाहायला मिळतं होती. मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याच्या वादावरून राणा दाम्पत्य आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपाणे राजकारण चांगलंच तापलं होतं. परंतु हेच संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लेहमध्ये वेगळ्याच मूडमध्ये दिसले आहेत. एकमेकांसोबत मैत्रीचे संबध असल्यासारखे दिसले. त्यावेळीचे काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंबद्दल दोघांनीही स्पष्टीकरण दिलं आहे.

नवनीत राणा यांना माध्यमांनी विचारलं असता त्या म्हणाल्या की, माझी लढाई, माझे विचार महाराष्ट्राच्या विकासासाठी आहेत. राऊत आले म्हणून मी जायचं नाही, हे मी करणार नाही. माझ्यावर मोठी जबाबदारी आहे, मी ती पार पाडण्यासाठी, समंजसपणा दाखवला आहे. मी संजय राऊतांशी बोलले, याचा अर्थ माझी लढाई संपली असं नाही. माझं आधीही तेच मत होत आणि आजही तसंच आहे. तसंच महाराष्ट्राची संस्कृती आणि समंजसपणा आम्ही जपला आहे.त्यावेळीच त्यांनी एक किस्साही सांगितलं. मला एका मुलीने विचारलं की बाईला कोणी पुढे काय येऊ देत नाही? त्यांना डॉमिनेट का करतात, तर मी तिला म्हटलं की, मी पुढे आलेच ना. मला एकटीला पाहून मला त्रास देण्याचा प्रयत्न अनेक वेळा करण्यात आला. मला जेलमध्ये टाकणारेही होते. त्यावेळी राऊतही तेथे उपस्थित होते. परंतु ते काहीच बोलले नाहीत.असं नवनीत राणा म्हणाल्या.

Nilam: