आपण आपल्या घरातील लहान बाळाला सर्दी खोकला व कफ झाल्यास काही घरगुती उपाय करतो. त्यामधील अत्यंत गुणकारी उपाय म्हणजे दैनंदिन वापरातील लसूण आणि ओवाविषयी आपण आज आपण माहिती घेऊ…
- यासाठी लसणाच्या २ पाकळ्या आणि १ चमचा ओवा घेऊन त्यांना तव्यावर भाजून घ्यावे. थंड झाल्यावर भाजलेले लसूण आणि ओवा एका कपड्यात बांधून घ्यावे.
- लसूण आणि ओवापुडी सर्दी, खोकल्यासाठी शक्तिशाली इलाज आहे. यांच्यामध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटिव्हायरल गुणधर्म असतात. हे मिश्रण लहान मुलांच्या सर्दी-खोकल्यासाठीदेखील उपयोगी आहे.
- यासाठी लसणाच्या २ पाकळ्या आणि १ चमचा ओवा घेऊन त्यांना तव्यावर भाजून घ्यावे. थंड झाल्यावर भाजलेले लसूण आणि ओवा एका कपड्यात बांधून घ्याव्यात. यानंतर ही पुडी बाळाच्या पाळण्यात त्याच्या नाकाजवळ ठेवावी. जेणेकरून ओवा आणि लसणाचा गंध बाळाच्या नाकाद्वारे आत जाईल. ह्या उपायाने बाळाची सर्दी नक्कीच कमी होईल.
मधाचे सेवन : मधामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटिअमायक्रोबियल गुणधर्म असतात. लहान बाळांसाठी सर्दी, खोकल्यात मध अत्यंत गुणकारी औषध आहे. ज्या बाळांना गळ्यात खसखस आणि नाकात सर्दीसारखे वाटत असेल त्यांना रात्री एक चमचा मधामध्ये थोडासा आल्याचा रस टाकून पिण्यास द्यावे. हा उपाय फक्त एक वर्षाच्या वरील बाळांसाठी आहे.
बाळाला हायड्रेटेड ठेवा : सर्दी-खोकला झाल्यावर शरीरात पाण्याची कमी होते, म्हणून बाळाला हायड्रेटेड ठेवण्यासाठी थोड्या थोड्या वेळात पाणी पाजत राहा. सर्दी-खोकला झालेल्या बाळाला कोमट पाणी पाजावे. कोमट पाणी पिल्याने त्याच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत मिळेल.
बाळाला वाफ द्यावी : छातीत कफ आणि सर्दी-खोकला झाल्यावर वाफ घेतल्याने खूप आराम मिळतो. लहान मुलांनादेखील ही समस्या होत असेल तर एका भांड्यात पाणी गरम करावे व त्या पाण्याच्या वाफेजवळ बाळाला धरून बसावे. त्याच्या छातीला आणि नाकावर हलकी हलकी स्टीम (वाफ) लागू द्यावी. असे केल्याने बाळाच्या छातीतील कफ मोकळा होईल व त्याला आराम मिळेल. जर तुमच्याकडे वाफेचे मशीन असेल तर तुम्ही त्याचादेखील वापर करू शकता. आपल्या घरातील लहान बालकांना वरीलपैकी सर्दी, खोकल्याची काही लक्षणे आढळल्यास तुम्ही घरगुती उपाय म्हणून लसूण, ओवा यांचा अवश्य उपयोग करा.