जगात दरवर्षी १८ मार्च हा दिवस वर्ल्ड स्लीप डे म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे लोकांना झोपेचे महत्त्व कळावे. झोपेबाबत जागृती निर्माण व्हावी आणि चुकीच्या झोपेच्या सवयी टाळल्या जाव्यात हा आहे.
रात्री अर्धवट झोप झाल्यास दिवसभर थकल्यासारखे आणि अस्वस्थ वाटते. सातत्याने अपुरी झोप मिळाल्यास त्याचा परिणाम तुमच्यावर आणि तुमच्या आरोग्यावर होतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात पूर्ण झोप होणे जरा अनेकांसाठी कठीण काम झालं आहे. पण पुरेशी झोप होत नसल्याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे कितीही काम असलं तरी वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करायला हवा. माझ्या मोबाइलच्या व्यसनामुळे माझे झोपेचे चक्र बिघडले. रात्री कॉफी पिणे, फ्रेंड्ससोबत गप्पा करणे यामुळेही झोप येत नाही. तसंच गप्पा करताना किती कॉफी घेतली जाते याचा आपल्याला अंदाजच नसतो. कॅफेनचा आपल्या झोपेवर काय परिणाम होतो.
आठ तासांच्या झोपेचे फायदे
दररोज सात ते आठ तासांची झोप आठवड्यातून तीन ते सहावेळा दररोज अर्धा ते एक तास व्यायाम केल्यास स्ट्रोकचा धोका कमी करता येऊ शकतो, झोपलेल्या अवस्थेमध्ये शरीराच्या आत आणि मेंदूद्वारे बरीच महत्त्वाची कामे पार पडली जातात. तणावमुक्ती, रोगप्रतिबंध, स्वच्छता, डागडुजी, शरीराची पुनर्मांडणी आणि बांधणी केली जाते. जेणेकरून ज्यावेळी आपण जागृत अवस्थेत असतो त्यावेळी होणार्या कामांसाठी आणि येणार्या आव्हानांसाठी शरीर पूर्ण क्षमतेने आणि शक्तीने तयार राहते. पृथ्वीवरच्या कोणत्याही जीवाला दीर्घकाळ, संतुलित, आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी आहाराइतकीच झोप महत्त्वाची आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर झोप ही संजीवनी आहे. नियमित, पुरेशी आणि गाढ झोप अतिशय महत्त्वाची आहे. मेंदूला आराम मिळण्यासाठी आणि झोप लागण्यासाठी कमीत कमी रात्री झोपण्यापूर्वी चार तास आधी कॅफेनयुक्त पदार्थ खाणे टाळा.
माणसाला निरोगी राहण्यासाठी कमीत कमी सहा ते आठ तास शांत झोपण्याची गरज असते. पण आजकाल अनेकांना चांगली झोपच लागत नाही. झोप अपूर्ण झाली की दिवसभर कंटाळवाणं आणि थकल्यासारखं वाटतं. रात्री उशिरा जेवणे, एखाद्या गोष्टीचा खूप विचार करणे, ताणतणाव, नातेसंबंधामधील ताण, वातावरणातील तापमान, मोबाइल, टीव्हीचा अतिवापर, रात्री कॅफेनयुक्त उत्तेजित पदार्थांचे सेवन करणे, आजारपण, रात्री उशिरा कामाची वेळ, संध्याकाळी वर्कआऊट करणे, घरातील प्रकाशयोजना, निद्रानाश अशा अनेक कारणांमुळे तुमची झोप पूर्ण होत नाही. मात्र यातील अर्ध्याहून अधिक गोष्टी या माणसाच्या जीवनशैलीचा भाग होत चालल्या आहेत. त्यामुळे अनेकांना ही चिंता सतावत असते की, झोप येण्यासाठी काय करावे. दररोज शांत आणि निवांत झोप येण्यासाठी काय करावे हे प्रत्येकाला माहीत असायला हवे.
झोप येण्यासाठी काय करावे :
योगा आणि मेडिटेशन करा.
दिवसा झोपणे टाळा.
झोपताना मंद, सौम्य संगीत ऐका
रात्री इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप, कॉम्प्युटर यापासून दूर राहा, बंद ठेवा
झोपेची पोझिशन बदला
कॅफेन घेणे टाळा
हॉट बाथ घ्या
मन आनंदी होईल असे विचार करा
अपुरी झोप अनेक आजारांना निमंत्रण देते. अंग जड पडणे, हातपाय दुखणे, थकवा जाणवणे अशा विविध समस्यांचा समावेश आहे. ज्या व्यक्तींची झोप पूर्ण होत नाही, अशा व्यक्तींना हृदयविकाराचा धोका अधिक असतो. झोप पूर्ण न झाल्यास चिडचिडेपणा वाढतो. लठ्ठपणा/वजन वाढते. सुदृढ व्यक्तीला साधारण सहा ते आठ तासाची झोप आवश्यक असते. झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करावी. रात्री पोटभर जेवू नये. दिवसा चांगला व्यायाम करावा म्हणजे रात्री झोप चांगली लागते.
दुपारी झोपलं की मगच फ्रेश वाटतं, दुपारी जेवणानंतर फार झोप येते, त्याशिवाय मी राहूच शकत नाही, अशी वाक्यं रुग्णांकडून नेहमी ऐकायला मिळतात. दुपारच्या जेवणानंतरची झोप ही भारतीयांमध्ये जास्त आढळणारी सवय आहे. जेवणानंतर वामकुक्षी घेणे, वामकुक्षी म्हणजे दुपारच्या जेवणानंतर डाव्या बाजूस, डाव्या कुशीवर विश्राम करणे! वामकुक्षी घेणे अतिशय चांगले आहे, कारण त्याने दुपारचे भोजन पचते! आपले जठर डाव्या बाजूस असल्याने खाल्लेले अन्न पचते. म्हणून झोपल्यावरही जास्तकरून डाव्या कुशीवर जास्त वेळ झोपावे, पोटासाठी, पचनासाठी चांगले तर वामकुक्षी ही दुपारच्या जेवणानंतर १५ ते २० मिनिटे घ्यायची असते. रात्रीच्या जेवणानंतर नाही, त्यावेळी शतपावली (सावकाश चालणे) करतात.
_विदुला कुलकर्णी