शरद पवारांनी घेतली मोदींची दिल्लीत भेट, ED च्या कारवाईनंतर राजकीय घडामोडींना वेग

वी दिल्ली : मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या फ्लॅट्स वर ईडी ने कारवाई केल्यांनतर महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु झाली आहेत. केंद्र ईडी सारख्या सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांवर कारवाई करत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे याहीवेळी राज्य विरुद्ध केंद्र असा वाद सुरु झाल्याचं चित्र दिसत आहे.

राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आज (बुधवारी) शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. हे दोन्ही नेते दिल्लीत भेटले की महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग येतो. सध्या हीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. मंगळवारी संध्याकाळी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राऊत आणि नितीन गडकरींनी सोबतच उपस्थिती लावली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार पवार यांनी पंतप्रधानांची झालेल्या चर्चेत राज्याचेही काही प्रश्न मांडले आणि जीएसटी थकबाकी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह काही मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजत आहे.

एकीकडं शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे तर दुसरीकडे काँग्रेस आमदारांनी नुकतीच सोनिया गांधी तसेच मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली. राज्यात काम न करणाऱ्या मंत्र्यांची पदं बदलण्यात यावी, असं त्यांनी सोनिया गांधींना सांगितल्याचं समोर आलं.

Dnyaneshwar: