लोणावळा : आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून महाराज्यस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी हा उपक्रम मागील आठवड्यातील गुरुवारपासून लोणावळा शहरात सुरू आहे. याच उपक्रमांतर्गत इंदिरानगर, न्यू तुंगार्ली या ठिकाणी गुरुवार दि. १९ आणि शुक्रवार दि. २० मे रोजी येथील नागरिकांसाठी एक अभियान घेण्यात आले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला. इंदिरानगर, न्यू तुंगार्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सनी दळवी यांनी नियोजन केलेल्या अभियानाचा महिला, पुरुष व तरुण तरुणी अशा एकूण ३४९ लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला.
यात प्रामुख्याने १५ उत्पन्नाचे दाखले, १०१ मतदान कार्ड, रेशन कार्ड मधून ११ नाव कमी करणे, १४ नाव वाढवणे, १२ दुबार कार्ड काढणे याशिवाय २२ जणांसाठी अन्नसुरक्षा अर्ज, ०८ उत्पन्न दाखले, ०५ संजय गांधी निराधार आणि १५१ जणांचे आधार कार्डचे काम करून देण्यात आले. उपक्रमात नवीन आधार कार्ड काढणे, जुने आधारकार्ड दुरुस्त करणे, नवीन शिधापत्रिका अर्ज स्वीकृती तसेच शिधावाटप पुस्तकावरील नाव कमी करणे व नावे वाढविणे, नगरपरिषदेच्या विविध योजनांबरोबर कोविड प्रतिबंधात्मक लसदेखील नागरिकांसाठी याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती