शिवसेना भवनासमोर हनुमान चालीसा

शिवसेना-मनसेे यांचा भोंग्यावरून सामना

मुंबई : मशिदीवरील भोंग्यांना विरोध करण्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतल्यानंतर मनसेनं आज शिवसेनेला डिवचले, त्यामुळे या मुद्यावर शिवसेना आणि मनसे असा सामना सुरू झाला.

मनसेनं शिवसेना भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालीसा ऐकवली. रामनवमीनिमित्त मनसेनं शिवसेनेवर कुरघोडी केली.पोलिसांनी भोंगा जप्त केला. तसेच मनसैनिकांना ताब्यात घेतलें. शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, असा टोला लगावला. स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरींल भोंग्यांवरून सरकारला फटकारले होते. हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केले. तेव्हापासूनच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

राज ठाकरेंनी हिंदुत्वावरून शिवसेनेवरही निशाणा साधला होता. तेव्हापासूनच मनसे आणि शिवसेनेत जुंपले.
दरम्यान, शिवसेना भवनासमोर टॅक्सीवर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा म्हटल्यानं मनसेचे विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांकडून भोंगाही जप्त केला होता. पोलिस स्टेशनखाली असलेल्या हनुमान मंदिरात मनसैनिकांनी हनुमान चालीसा म्हटली.

Dnyaneshwar: