आज सलग दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात घसरण झाली. विकली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 566.09 अर्थात 0.94 टक्क्यांनी घसरून 59610.41वर बंद झाला, तर निफ्टीमध्येही 149.75 अर्थात 0.83 टक्क्यांची घसरण होऊन 17,807.65 बंद झाला. शेअर बाजारात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या तेजीला आता ब्रेक लागला आहे.
तत्पूर्वी आज विकली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकात आजच्या दिवसाच्या सुरुवातीला घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी आज गॅप डाऊन ओपनिंग दिलं. सेन्सेक्स 360.79 अंकांच्या घसरणीसह 59815.71वर सुरु झाला. तर निफ्टीही 115 अंकांच्या घसरणीसह 17842.75 वर सुरु झाला.