श्रीलंकेतील महागाईचा फटका आशियाई स्पर्धेच्या यजमान पदाला…

नवी दिल्ली : श्रीलंका सध्या आर्थिक मंदीचा सामना करत आहे. देशातील या परिस्थितीमुळे त्यांचे आशियाई स्पर्धेचे यजमानपद गमावण्याचा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. श्रीलंकेतील विद्यमान राजपक्षा सरकार अर्थिक मंदीचा सामना करत आहे. गरजेच्या वस्तू आयात करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. या परिस्थितीचा श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला फटका बसण्याचे संकेत मिळत आहेत. श्रीलंकेची परिस्थितीत इतकी बिकट आही की, त्याठिकाणी भारतात सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग आयपीएल 2022 च्या 15 व्या हंगामातील सामन्याचे प्रसारणही बंद करण्याची वेळ आली आहे.

या वर्षीच्या आशियाई कप क्रिकेट स्पर्धेच्या 15 व्या हंगामाचे यजमानपद श्रीलंकेला मिळाले आहे. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत रंगणाऱ्या स्पर्धा श्रीलंकेत होणार का? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियात नियोजित ICC टी-20 वर्ल्ड कप 2022 ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार असून आहे. या पार्श्वभूमीवर आशियाई स्पर्धा देखील टी-20 प्रकारातच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण ही स्पर्धा अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत आयसीसी अंतिम निर्णय अंतिम निर्णय घेणार आहे.

पाकिस्तानच्या एका वृत्तानुसार, श्रीलंकेतील परिस्थिती पाहता आगामी आशियाई कप स्पर्धा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येऊ शकते. यासंदर्भात अद्याप आयसीसीने कोणतीही भूमिका मांडलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची आयसीसी तिमाही बैठक दुबईमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहेत.

admin: