सुप्रिया सुळे थेट संतप्त एसटी कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात…

Supriya sule public emageSupriya sule public emage

मुंबई : कालच्या हायकोर्टाच्या निर्णयानंतर आज एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असून मोठ्या प्रमाणात कर्मचारी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर दाखल झाले आहेत. याठिकाणी चप्पल आणि दगडफेक सुरू झाली आहे. एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून कोर्टाचा निर्णय मान्य नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. या संपूर्ण परिस्थितीला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. माझी आई आणि मुलगी घरात आहेत. असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे या थेट संतप्त कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात शिरल्या आहेत.

माझी सर्व कर्मचाऱ्यांशी बोलण्याची तयारी आहे. मात्र, शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचा पर्याय त्यांनी संतप्त कर्मचाऱ्यांसमोर ठेवला आहे. आई आणि मुलगी यांची सुरक्षितता सुनिश्चित करू द्या. त्यानंतर मी पुन्हा तुमच्याशी शांततेच्या मार्गाने संवाद साधायला तयार आहे, अशी विनंता सुप्रिया सुळे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केली.

कोर्टाचा निर्णय मान्य नसल्याचे नसल्याचे सांगत, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असून मोठ्या प्रमाणात कर्मचारी शरद पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत. याठिकाणी चप्पल आणि दगडफेक सुरू झाली आहे. कर्मचाऱी आक्रमक झाले आहेत. या संपूर्ण परिस्थितीला शरद पवार जबाबदार असल्याचा कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

admin:
whatsapp
line