सैफ अली खानचा मुलगा अन् श्वेता तिवारीच्या मुलीचं ‘ब्रेक अप’! सलमानचा मोठा खुलासा; म्हणाला…

Ibrahim Khan-Palak Tiwari Break Up : सलमान खानच्या ज्या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत होते त्या बहुप्रतिक्षित अशा ‘किसी का भाई किसी की जान’ नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यातील सलमानच्या स्टाईलवर चाहते फिदा आहेत.

काही दिवसांपासून प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानचा लेक इब्राहिम खान आणि टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीच्या मुलीची पलकच्या डेटिंगची चर्चा रंगली होती. त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. यासगळ्यात सलमाननं केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

इब्राहिम आणि पलकमध्ये ब्रेक अप झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. किसी का भाई किसी की जानमध्ये सलमानसोबत शहनाज गिल, पलक तिवारी, झळकणार आहेत. यावेळी सलमाननं सेटवरील काही किस्से शेयर केले असून त्यातून पलकचं ब्रेक अप झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. यासगळयात सलमाननं पलकच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी पोलखोल केली आहे.

सलमाननं दिलेल्या त्या हिंटमुळे पलक आणि इब्राहिममध्ये ब्रेक अप झाल्याचे बोलले जात आहे. ट्रेलरच्या लॉचिंगच्या वेळी पलकचा तोल गेला होता आणि ती पडता पडता वाचली होती. यासगळ्यात सलमाननं त्यावरुन तिला चिडवले. ती यापूर्वी पहिल्यांदा प्रेमात पडली आहे. त्यावेळी तिनं डोळ्यानं सलमानला काही न बोलण्यास सांगितले. सिद्धार्थसोबत पलकची केमिस्ट्री चांगलीच रंगली होती. असे सलमाननं सांगितलं.

Prakash Harale: