‘हिंदुंच्या जीवावर सत्तेत आला त्या हिंदुंना मरायच्या अवस्थेत सोडलं…’; नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर निशाणा

कोल्हापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. कोरोनाच्या काळात पंतप्रधानांनी अचानक लाॅकडाऊन केलं. यामध्ये लाखो लोकांची उपासमार झाली. याउलट भारतात तयार झालेली कोरोना प्रतिबंधक लस पाकिस्तानला मोफत दिली त्यावेळी यांचे हिंदुत्व कोठे होते असा सवाल करत देशात एकीकडे हिंदुच्या जीवावर सत्तेत आला. त्या हिंदुना मरायच्या अवस्थेत सोडले. गंगासारख्या पवित्र नदीत हिंदुंची प्रेत तरंगताना संपूर्ण जगाने पाहिले, त्यावेळी तुमचे हिंदुत्व कोठे होते, अशी गंभीर टिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. या पध्दतीची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे होती. देशातील खरेदी क्षमता 83 टक्केने कमी झाली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि मुठभर मित्रांसाठी केंद्र सरकार चालवले जात आहे. हिंदुत्वाच्या नावाने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्या कोल्हापूरमध्ये ज्या पध्दतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही निवडणूका आल्यानंतर हिंदुना मतदानाचे मशिन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्यावतीने सुरु झाला आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलेल्या कामाबद्दल टिका करण्यासाठी बाहेरचे लोक आणावे लागले. भाजपला शेतकरी, कामगार, उद्योजक, व्यावसायिकांची चिंता नाही, त्यामुळे ते धर्माच्या नावाखाली निवडणूक लढवत आहेत. आम्ही श्रीराम मानतो, आम्हीही हिंदुच आहोत. पण देवांचा वापर निवडणूकीसाठी करत नाही. असाही टोला देखील नाना पटोलेंनी लगावला आहे.

Sumitra nalawade: