‘…ही मानसिक अवस्था मी समजू शकत होतो’; संजय राऊतांची संपत्ती जप्त केल्यानंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. संजय राऊत यांचे अलिबाग मधील ८ फ्लॅट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता विरोधी पक्ष भाजपाकडून संजय राऊतांवर निशाणा साधण्यात येत आहे. तसंच आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

किरीट सोमय्या म्हणाले, ‘प्रविण राऊतचे मित्र स्नेही संजय राऊत, उद्धव ठाकरेंचे उजवे हात जे प्रविण राऊतचे मित्र आहेत, स्नेही आहेत आणि भागिदार आहेत. संजय राऊत आणि प्रविण राऊत यांच्या पत्नींचे आर्थिक व्यवहार बाहेर आलेले आहेत. आज ईडीने कारवाई करुन संजय राऊत यांची अलिबागमधील काही जमीन, संपत्ती आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त केला आहे.’

‘संजय राऊत यांना आधीच लक्षात आलं म्हणून त्यांनी १० महीन्यांपूर्वी ईडी कार्यालयात जाऊन ५५ लाख रुपये परत केले होते. ईडीची काही दिवस कारवाई सुरू होती. आमच्याकडे देखील माहिती येत होती. गेले दोन महीने संजय राऊत यांची धडपड, धावपळ, बोगस पत्र व्यवहार, ईडीवर आरोप करणे, किरीट सोमय्या, निल आणि मेधा सोमय्या यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे ही मानसिक अवस्था मी समजू शकत होतो. ‘असं देखील किरीट सोमय्या म्हणाले.

पुढे किरीट सोमय्या म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं होतं की संजय राऊत यांनी १२ पानी पत्र लिहिलं किंवा राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं किंवा मनवानी यांच्या नावाने ईडीचे अधिकारी किरीट सोमय्यांवर आरोप केले तरी कारवाई होईल. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या उद्धट सरकारला वाटत असेल की पोलिसांचा माफियासारखा वापर करुन केंद्रीय तपास संस्थांमधील प्रामाणिक अधिकाऱ्यांचं तोंड बंद करता येईल, परंतू कारवाई होणार आहे.’

Sumitra nalawade: