चंदिगढ : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील प्रत्येक घरात 300 युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे अशी घोषणा केली. त्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असल्याचं हि त्यांनी सांगितलं, त्यामुळे पंजाब सरकारचं राज्यभरातून कौतुक केल जात आहे. भगवंत मान यांच्या सरकारला सत्तेत येऊन आता एक महिना पूर्ण झाला आहे .
तसेच गेल्या काही दिवसांपूर्वीच आपचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, राज्यातील जनतेला 300 युनिट मोफत वीज देण्याच्या योजनेची ब्लू प्रिंट तयार आहे.त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांकडून मोफत वीज कधी मिळणार असे प्रश्न विचारले जात होते . त्यांच्या या प्रश्नांना आप सरकारने आज उत्तर दिल असून दरमहा ३०० युनिट मोफत देण्याचं आश्वासन हि पूर्ण केलं आहे.
सत्तेत आल्यानंतर एक आमदार एक टर्म पेन्शन देण्याचा ऐतिहासिक निर्णयही या सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना 101 कोटींची मदत जाहीर करण्यात आली तसेच घरपोच रेशन देण्याचाही निर्णय हि घेतला . ग्रामीण विकास निधीसाठी 1000 कोटींची घोषणा करण्यात आली आणि आप आमदारांना जनतेसाठी पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंजाबमध्ये आपचं सरकार आल्यानंतर भगवंत मान यांनी 25 हजार पदांची सरकारी नोकर भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. व पद्धतीनं काम करणाऱया 35 हजार कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात येणार आहे.