बिष्णोई गँगचा लिडर लॉरेन्स बिष्णोई याला जो कोणी ठार मारेल त्याला १ कोटी रुपयाचे बक्षीस देऊ अशी घोषणा करणी सेनेचा प्रमूख राज शेखावत यांनी केली आहे. करणी सेनेच्या सुखदेव सिंग गोडामडी यांची हत्या बिष्णोई टोळीने केली होती. त्यामूळे यासाठी कारणीभूत असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईला ठार मारण्यासाठी हे बक्षीस ठेवण्याची घोषणा शेखावत यांनी केली आहे. यासंदर्भात आयएएनएस या वृत्तसंस्थेन वृत्त दिले आहे.
लॉरेन्स बरोबर गोल्डी ब्रार व रोहित गोध्रा यांना मारण्यासाठी ५१ लाख रुपये तर संपत नेहरा व विरेंद्र चरण यांना मारण्यासाठी प्रत्येकी २१ लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले.आहे. करणी सेनेचे सुखदेव गोडामोडी यांची ५ डिसेंबर २०२३ रोजी जयपूर येथे हत्या करण्यात आली होती.
व्हिडीओद्वारे आवाहन
शेखावत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये शेखावत यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे. सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे करणी सेना संतापली आहे. यामुळेच शेखावत यांनी बिश्नोईचा एन्काउंटर करा, असे पोलिसांना आवाहन केले आहे. गोगामेडी यांची हत्या बिश्नोई याच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे शेखावत यांनी म्हटले आहे. शेखावत यांनी ‘X’ वर एक पोस्ट लिहित क्षत्रिय करणी सेनेची ही मागणी केंद्र सरकारने तत्काळ पूर्ण करावी अशी मागणी केली आहे.