१०० कर्मचाऱ्यांना Maruti Suzuki कार; चांगल्या कामासाठी IT कंपनीकडून भेट

चैन्नई : चैन्नईमध्ये Ideas2IT नावाची एक सॉफ्टवेअर कंपनी आहे जी सॉफ्टवेअर सेवा पुरवते. त्या कंपनीने आपल्या १०० कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकी कार भेट दिल्या आहेत. कंपनीच्या वाढीसाठी आणि यशासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना हे बक्षिस देण्यात आलं असल्याचं सांगितलं.

“आमच्या कंपनीत सध्या ५०० कर्मचारी काम करत आहेत. त्यापैकी १० वर्षांपेक्षा जास्त काळ कंपनीसाठी काम करणाऱ्या आणि कंपनीच्या वाढीसाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही ही भेट दिली आहे. कंपनीला मिळालेला नफा हा कर्मचाऱ्यांसाठी देण्याचा आमचा संकल्प आहे.” असं Ideas2IT कंपनीच्या मार्केटींग प्रमुखाने सांगितलं. तसंच कंपनीचे संस्थापक अध्यक्ष मुरली विवेकानंद म्हणाले की, “आमच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी मोठं योगदान दिलं आहे.

“कंपनीकडून कारचं बक्षीस मिळणे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असून कंपनी सारखंच कर्मचाऱ्यासाठी सोन्याचं नाणं, iPhones या सारखे बक्षीस देत असते. पण यावेळी बक्षीस म्हणून दिलेली कार ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे.” असं कंपनीत काम करणाऱ्या आणि कार बक्षीस मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच चैन्नईच्या Kissflow या IT कंपनीने आपल्या पाच वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी सुमारे एक कोटी किमतीच्या BMW कार भेट दिल्या होत्या. त्यानंतर आता चैन्नईतीलच Ideas2IT या सॉफ्टवेअर कंपनीने आपल्या १०० कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकी कार भेट दिल्या आहेत. या १०० कारची किंंमत सुमारे १५ कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातंय.

Dnyaneshwar: