सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; गॅस सिलिंडरच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ

lpg gaslpg gas

नवी दिल्ली | ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईची (Inflation) झळ सहन करावी लागणार आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली असताना एलपीजीच्या दरांत 100 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळते. ही 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे तर घरगुती सिलेंडरचे दे जैसे थे आहेत. व्यावसायिक सिलेंडरच्या वाढवण्यात आलेल्या किमतींचा प्रभाव खाद्य उद्योग आणि रेस्टॉरंट व्यवसायावर दिसून येईल.

1 नोव्हेंबरपासून, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत 1785.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी महागली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1684 रुपये होते. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1833 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. गेल्या महिन्यात 1 ऑक्टोबर रोजी कमर्शियल सिलेंडरची किंमत 1731.50 रुपये होती. दिल्लीत आजपासून कमर्शियल एलपीजी 101.50 रुपयांनी महाग झाला आहे. कोलकातामध्ये एलपीजीची किंमत 103.50 रुपयांनी वाढून 1943 रुपयांवर पोहोचली आहे, तर गेल्या महिन्यात त्याचा दर 1839.50 रुपये झाला होता. तर चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 1999.50 रुपयांवर आली असून 101.50 रुपयांनी वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये त्याचे दर 1898 रुपये होते.

घरगुती गॅस सिलेंडरचे दर ‘जैसे थे’
1 नोव्हेंबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि तो जुन्याच दरांवर कायम आहे. देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांवर नजर टाकल्यास, 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलेंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना मिळतो.

Sumitra nalawade:
whatsapp
line