मुंबई | Hollywood Writers Strike – हाॅलिवूडचे तब्बल 11,500 लेखक संपावर गेल्याची माहिती समोर आली आहे. हाॅलीवूडचे टेलिव्हिजन आणि चित्रपटासाठी काम करणारे लेखक या संपावर गेले आहेत. त्यामुळे तेथे रात्री लागणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसंच कार्यक्रम रद्द केल्यामुळे त्या कार्यक्रमांचे रिपीट टेलिकास्ट सुरू करण्यात आले आहेत.
‘Writers Guild Of America’च्या 11,500 लेखकांनी हा संप पुकारला असून त्यांनी त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत. या लेखकांनी हाॅलिवूडमधील स्टुडिओज, प्रोडक्शन कंपन्या आणि निर्मात्यांच्या विरोधात हा संप पुकारला आहे. आपलं वेतन वाढवून मिळावं यासाठी हे लेखक रस्त्यावर उतरले आहेत. युनिव्हर्सल, डेन्सी, नेटफ्लिक्स, पॅरामाऊंट, अॅपल अशा मोठमोठ्या स्टुडिओजकडे लेखकांनी वेतन वाढीची मागणी केली आहे.
फ्रीलान्सर्सप्रमाणे लेखकांना मानधन दिलं जातं, त्यामुळे त्यांना ठोस अशी रक्कम कधीच कोणत्याही स्टुडिओकडून मिळत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. यावर तोडगा काढण्याची मागणीही लेखकांनी केली आहे.