देशभरात २४ तासांत १२४७ तर राज्यात १३५ रुग्ण; आरोग्यमंत्र्यांकडून सूचना

मुंबई : काहीच दिवसांपूर्वी देशातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने राज्य तसेच केंद्र सरकारने सर्व निर्बंध हटवले मात्र अजून एक महिनाही झाला नाही तर देशातल्या अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. देशात २४ तासांत १२४७ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळं सरकारला चिंता लागून राहिली आहे.

महाराष्ट्रातही गेल्या दोन दिवसांत राज्यात अचानक करोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी महाराष्ट्रात ५९ रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी त्यात दुपटीहून अधिक म्हणजेच १३७ नवे करोनाबाधित वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. मात्र याबाबत घाबरण्याचं कारण नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

राजेश टोपे म्हणाले की, केंद्रानं दिलेल्या पत्रात काही राज्यांचा उल्लेख केला आहे. काल मी घेतलेल्या आढाव्यात महाराष्ट्रात एकूण १३५ केसेस आढळल्या आहेत. त्यात मुंबईमध्ये ८५ केसेस आहेत. महाराष्ट्राने ६० हजार केसेस रोज पाहिल्या आहेत. त्यामुळे अतिशय नियंत्रित अशी ही परिस्थिती आहे. कुठेही घाबरण्याचं कारण नाहीये. लसीकरणाचं प्रमाण देखील चांगलं झालं आहे” असही ते आज माध्यमांशी बोलताना म्हणाले.

त्याचबरोबर सर्वांनी लसीकरण करून घाव असं आवाहन त्यांनी केलं आहे. ज्येष्ठ नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचा देखील सल्ला त्यांनी दिला आहे. १२ ते १८ वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला देखील आम्ही प्रोत्साहन देतोय. असंही ते म्हणाले.

Dnyaneshwar: