इंडियन मेडिकल असोसिएशन आयोजित प्रशिक्षण शिबिरात २५० डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांच्याकडून बीएएसएफ आणि नॅशनल पॉयझन इन्फॉर्मेशन सेंटर (एनपीआयसी), एआयआयएमएस (नवी दिल्ली) यांच्या सहकार्याने कंटिन्यूइंग मेडिकल एज्युकेशन (सीएमई) वर एका विशेष व्हर्च्युअल ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आहे होते.

यामध्ये २५० डॉक्टर्स आणि वैद्यकीय विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्रशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट वैद्यकीय व्यवसायातील सहकाऱ्यांना मान्यताप्राप्त प्रोटोकॉल्स (नियमावली) अनुसार अपघाती कृषी रासायनिक विषबाधांच्या घटनांची हाताळणी आणि निदान व उपचारांच्या प्रोटोकाॅल्सविषयी एक उजळणी होणे हे होते. डॉ. देबव्रत कानुंगो, मेडिको टॉक्सिकॉलॉजी, ह्यूमन हेल्थ रिस्क ॲसेसमेन्ट ॲण्ड फूड सेफ्टी या विषयावरील जागतिक तज्ज्ञ यांनी एका सखोल प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.

‘शिक्षण ही कधीच न संपणारी प्रक्रिया असते आणि वैद्यकशास्त्रामधील सर्वांत अलीकडच्या प्रगतीविषयी अद्ययावत माहिती करून घेणे हे वैद्यकीय व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते आणि आयएमएचा हा प्रशिक्षण कार्यक्रम डॉक्टरांना अपघाती कृषी रासायनिक विषबाधेच्या प्रसंगांचे निदान व उपचार करण्यासाठी मदत करील. आयएमएमध्ये आम्ही सर्वजण आपल्या देशातील शेतकऱ्यांवर परिणाम करणाऱ्या या महत्त्वाच्या विषयावरील प्रशिक्षणाचा प्रस्ताव मांडणाऱ्या व त्याला साहाय्य करणाऱ्या बीएएसएफची प्रशंसा करतो. एक जबाबदार पीक संरक्षण साधन पुरवठादार या नात्याने यातून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत बीएएसएफची बांधीलकी अधोरेखित होते.’

– डॉ. सहजानंद प्रसाद सिंग, नॅशनल प्रेसिडेंट, आयएमए (एचक्यू)

भारतामध्ये शेती हा आपल्या संलग्‍न क्षेत्रांसह उपजीविकेचा सर्वांत मोठा मार्ग आहे. भारतीय ग्रामीण कुटुंबांपैकी ७० टक्के अद्यापही आपल्या उपजीविकेसाठी प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असतात. १०० दशलक्षाहून जास्त शेतकरी असल्यामुळे अपघाती कृषी रासायनिक विषबाधेच्या घटना घडतच असतात. कोणतीही घटना घडल्यानंतर पहिल्या काही तासांमध्ये अचूक शोध, योग्य रोगनिदान आणि तत्काळ उपचार केले जाणे आवश्यक असते. शेतकऱ्यांची सेवा करीत असलेल्या आयएमए आणि एनपीआयसी यांना मदत करणे महत्त्वाचे आहे, असे राजेंद्र वेलागला, बिझिनेस डायरेक्टर, ॲग्रिकल्चरल सोल्यूशन्स, बीएएसएफ म्हणाले.

Dnyaneshwar: