IPL 2023 : जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा थरार 31 मार्चपासून सुरू होत आहे. इंडियन प्रीमियर लीग आधी एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी दिसत होते. हे फोटो पाहून सगळेच म्हणत होते की, 3 इडियट्सचा सिक्वेल तयार होत आहे.
करीना कपूर खानपासून ते बोमन इराणी आणि जावेद जाफरी यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र दरम्यान या पत्रकार परिषदेचे सत्य समोर आले आहे, याचा संबंध 3 इडियट्सच्या सिक्वेलशी नसून एका जाहिरातीशी आहे.
खर तर आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांचा हा व्हिडिओ ड्रीम 11ची जाहिरात आहे. हे तिघे पत्रकार परिषद घेत असल्याचे जाहिरातीत दिसत आहे. जिथे क्रिकेटबद्दलही बोलले जात आहे. या तिघांचेही म्हणणे आहे की, आजकाल क्रिकेटर्स खूप अभिनय करत आहेत.
अशा परिस्थितीत आता कलाकारही क्रिकेट खेळायला लागतील. व्हिडिओमध्ये अनेक मजेशीर क्षण आहेत आणि या तिघांशिवाय अनेक क्रिकेटर्सही दिसत आहेत. जेव्हा हे तीन क्रिकेटपटू क्रिकेटर्सची खिल्ली उडवतात तेव्हा क्रिकेटर त्यांच्यासोबत मस्ती करतात, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.