पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ८ इंद्रायणीनगर येथील स्पाईन सिटी सर्कल या ठिकाणी प्लेगेथॉन मोहिम राबविणेत आली. मॉर्निंगवॉकला येणाऱ्या शेकडो नागरिकांनी यात सहभाग नोंदविला. या स्वच्छता प्लेगेथॉन मोहिमेमध्ये ३५० किलो कचरा संकलित करण्यात आला. इंद्रायणीनगर येथील स्पाईन सिटी सर्कल या ठिकाणी स्वच्छता मोहिम घेण्यात आली. या मोहिमेमध्ये शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे व मोशी, इंद्रायणीनगर या ठिकाणचे नागरिक उपस्थित होते. क क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांनी स्वच्छतेविषयक व प्लॅस्टिक बंदीविषयक तसेच कचरा विलगीकरणाबाबत मार्गदर्शन केले.
आपले पिंपरी- चिंचवड शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले. या उपक्रमात उपस्थित नागरिकांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.सहाय्यक आरोग्याधिकारी तानाजी दाते, मुख्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजिनवाल, प्रभाग क्र ८ चे आरोग्य निरीक्षक क्षितीज रोकडे, आरोग्य निरिक्षक वैभव घोळवे तसेच महापालिका अधिकारी आणि कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी सहभाग घेऊन या मोहिमेस उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.