500 पेडलर पुणे पोलिसांचं पुढचं टार्गेट; त्यात 50 महिलांचा समावेश

Blue Guest Featured Live Event Twitter Post 9Blue Guest Featured Live Event Twitter Post 9

पुणे | पुण्यात मागील काही दिवसांपासून (Drugs) ड्रग्सच्या तस्करींचं प्रमाण (PMC News) वाढलं आहेत.त्यातच मागील आठवड्यात 4000 कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आल्यानंतर आता पुणे शहरातील 500 ड्रग्ज ‘पेडलर’ पुणे पोलिसांच्या रडारवर आहे. पुण्यात ड्रग्सची खरेदी विक्रीमध्ये महिला आणि परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे. (Pune Crime News)

पुणे पोलिसांनी मागील 3 वर्षात केलेल्या कारवाईत तब्बल 50 महिलांचा समावेश असल्याचं आकडेवारीवरुन समोर आलं आहे. या महिलांकडून ड्रग्जचा पुरवठा होत असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. या कालावधीत 30 परदेशी नागरिकांना देखील पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्यावर देखील पोलीस नजर ठेवून आहेत. या पेडलरांना ड्रग्ज कोठून येतो याची साखळी शोधत ती पुर्णपणे उद्धस्थ करण्याचे काम गुन्हे शाखेने हाती घेतली आहे. मागील तीन वर्षांपासून आत्तापर्यंत अशी 535 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे.

Rashtra Sanchar Digital:
whatsapp
line