नवी दिल्ली – 5G In India | केंद्र सरकारकडून 5G स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी मंजुरी दिली आहे. तब्बल ९ स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी केंद्राच्या दूरसंचार विभागाकडून अर्ज देखील मागवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार २६ जुलै २०२२ रोजी लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 5G मुळे इंटरनेटची स्पीड 4G पेक्षा दहापट असणार असल्याची माहिती दूरसंचार विभागाकडून देण्यात येत आहे.
या लिलावात स्पेक्ट्रमची एकूण किंमत ५ लाख कोटी रुपये ठेवली असल्याची माहिती आहे. यामध्ये ६००, ७००, ८००, १८००, २१००, २३००, आणी २५०० मेहर्ट्झ बँडचा लिलाव होणार आहे. हा लिलाव २० वर्षांसाठी असेल. या 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाच्या अनुषंगाने केंद्र सरकारला लावकरात लवकर 5G सेवा सुरु करण्याचा मानस असल्याचे दिसत आहे.
दूरसंचार विभागाने देशात २०२२ पर्यंत 5G सेवा उपलब्ध करून देणारं असल्याचं आश्वासन दिलेलं होतं. देशातील 13 शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात 5G ची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे सह अहमदाबाद, बेंगळुरु, चंडीगढ, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता आणि लखनऊ या शहरांचा समावेश आहे.