“८ नोव्हेंबर हा भारतीय अर्थव्यवस्थेतला काळा दिवस”; नाना पटोले

मुंबई – DEMONITIZATON IN INDIA : ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेतील मोठा निर्णय घेतला होता. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने नोटा बंदीचा निर्णय घेतला होता. ८ नोव्हेंबर २०१६च्या दिवशी अचानक घेतलेल्या या निर्णयाने देशभरातील मध्यमवर्गीय लोकांची मोठी पळापळ झाली होती. मात्र, काळा पैसा बाहेर येईल या आशेने लोकांनी तास न तास रांगेत उभा राहून आपल्याकडील नोटा बदलून घेतल्या.

या नोटाबंदीच्या निर्णयानंतर काही काळाने या निर्णयात कसलाही काळा पैसा बाहेर आला नसल्याचं आरबीआयने सांगितले. त्यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय फोल ठरला. त्यानंतर विरोधकांकडून याच निर्णयावरून नरेंद्र मोदी सरकारवर अजूनही टीका केली जात आहे. कॉंग्रेसचे नाना पाटोले यांनी हा दिवस भारतीय अर्थव्यवस्थेतील काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे.

ते म्हणाले, “मनमानी, हुकूमशाही पद्धतीने मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेऊन देशातील गोरगरिबांना देशोधडीला लावले. भ्रष्टाचार मिटणार, काळा पैसा येणार अशा वल्गना फोल ठरल्या आहेत. गरिबांना छळणाऱ्या या निर्णयाचा तीव्र निषेध!”अशा शब्दांत त्यांनी नोटाबंदीच्या दिवसाची आठवण केली आहे.

दरम्यान, केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयाची चौकशी करण्यात यावी अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला आहे.

Dnyaneshwar: