नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान! आणखी 7 जणांचा मृत्यू, अशोक चव्हाण संतापले; म्हणाले, “याला सरकार जबाबदार…”

नांदेड | Nanded Hospital – नांदेडच्या (Nanded) शासकीय रूग्णालयात 24 तासात 24 रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ताजी असतानाच आज याच रूग्णालयात आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

अशोक चव्हाण यांनी ट्विट करत रूग्णालयातील मृतांच्या आकड्याबाबत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला. अशोक चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी 7 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये 4 बालकांचाही समावेश. याला राज्य सरकार जबाबदार आहे, राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी.

नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

नांदेडमधील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये बारा नवजात बालकांचा समावेश आहे. रूग्णालयात वेळेवर औषध पुरवठा झाला नसल्यानं रूग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Sumitra nalawade: