बापरे ! सरकारी क्लर्कच्या घरी सापडले ८० लाख रुपये कॅश

मध्य प्रदेश पोलिसांनी बुधवारी सरकारी लिपिकाच्या घरातून ८५ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. मध्य प्रदेशच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणाच्या तपासात टाकलेल्या छाप्यादरम्यान ही रक्कम जप्त करण्यात आली. राज्य वैद्यकीय शिक्षण विभागातील लिपिक हिरो केसवानी असे लिपिकाचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेण्यासाठी हिरो केशवानीच्या निवासस्थानी पोहोचले होते. मात्र, तेव्हा केसवानी आजारी पडलेला असल्याने अधिकाऱ्यांनी तपास केला नव्हता. दरम्यान, केसवानीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

हिरो केसवानीने 4,000 रुपये प्रति महिना पगार घेऊन नोकरीची सुरुवात केली होती आणि सध्या ते दरमहा 50,000 रुपये एवढा पगार तो कमावतो. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम लिपिकाच्या घरात मिळणे हे शंकास्पद असल्याने चौकशी केली जात आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Dnyaneshwar: