“भाऊंचे व्यक्तिमत्त्व राष्ट्रीय चारित्र्याचे आदर्श”: पूज्य गोविंद गिरी

पुणे : द्वारकादास हस्तिमलजी माहेश्वरी ऊर्फ ‘भाऊ’ यांच्यासारखे चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व हे या हिंदुस्थानाचे खरे चारित्र्य आहे. प्रामाणिक कष्टातून आणि ध्येयपूर्तीतून आयुष्य कसे सुंदर करावे याचे हे आदर्श उदाहरण आहे, असे गौरवोद्गार पूज्य गोविंद गिरीमहाराज ऊर्फ किशोरजी व्यास यांनी काढले. द्वारकादास श्यामकुमार वस्त्रदालनाचे प्रमुख भाऊ यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार माहेश्वरी समाजाच्या वतीने करण्यात आला. निवेदक व कलाकार शेखर सुमन यांनी सूत्रसंचालन केले. अत्यंत भावविभोर आणि कृतज्ञतापूर्वक वातावरणात झालेल्या सोहळ्यात गोविंद गिरी यांनी भाऊंचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व भाषणातून उभे केले.

या वेळी त्यांच्या कर्तृत्वावर आधारित ‘भाऊ’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुण्यातील आणि पंचक्रोशीतील मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. एका लहानशा दुकानापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या भाऊंची आज द्वारकादास श्यामकुमार या नावाने महाराष्ट्रभरात पन्नास दुकाने आहेत. ‘१०० दुकाने झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही’, असा संकल्प सोडून त्यांनी अत्यंत तरुण वयामध्ये या व्यवसायाचा शुभारंभ केला. त्यानंतर त्यांच्या पुढील पिढीने बांधकाम, कार्बन उत्पादन अशा अनेक क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेतली. या सर्वांचे प्रेरणास्रोत ‘भाऊ’च आहेत.

Dnyaneshwar: