MORBI POOL COLLAPSE : गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवरील जुना झुलता पूल रविवारी सायंकाळी कोसळला ज्यामुळे आतापर्यंत 134 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी मोठी कमीटी देखील स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, पुलाची देखभाल आणि ऑपरेशनचे काम एका प्रायवेट एजन्सींना देण्यात आले होते. अशा एजन्सींविरुद्ध पोलिसांनी दोषी मनुष्यवधाच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे. ‘बी’ विभागाचे पोलिस निरीक्षक प्रकाश देकिवाडिया यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की,’मोरबी शहरातील मच्छू नदीवरील पूल जवळपास आठ महिन्यांपासून वापरात नव्हता. कारण स्थानिक प्रशासनाने त्याच्या देखभालीसाठी “खाजगी एजन्सी” ची मदत घेतली होती. पुलाच्या देखभाल आणि व्यवस्थापनात त्यांचा “कॅलस पध्दत” मानवी मृत्यूला कारणीभूत ठरू शकते हे माहीत असूनही एजन्सीने हा पूल पर्यटकांसाठी खुला केला, असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, पूल कोसळल्याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे. नऊ जणांमध्ये पुलाचे व्यवस्थापन करणाऱ्या ओरेवा ग्रुपचे २ व्यवस्थापक, २ तिकीट बुकींग क्लर्क यांचा समावेश आहेत यासंबंधित राजकोट रेंजचे आयजी अशोक यादव यांनी दिली आहे.