नवी दिल्ली : आज देशातील मोठ्या विरोधी पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. (9 opposition leaders wrote letter to PM Narendra Modi) यामध्ये के चंद्रशेखर राव (Chandrashekar Rao), ममता बॅनर्ज्जी (Mamata Banerjee), अरविंद केजरीवाल (Arvind Kejarival), शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), फारुक अब्दुल्लाह (Farooq Abdullah), भगवंत मान (Bhagvant Mann), तेजस्वी यादव (Tejaswi Yadav), अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी सर्वांनी मिळून हे पत्र पाठवले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांवर दबाव आणला जात आहे. तसेच देश हुकुमशाहीच्या (Dictatorship) दिशेने जात असल्याचा आरोप पत्रामध्ये करण्यात आलेला आहे. राज्यपाल मंत्रीमंडळांच्या निर्णयात हस्तक्षेप करत असल्याचाही आरोप पत्रामध्ये करण्यात आलेला आहे. 9 opposition leaders wrote letter to PM Narendra Modi
काय आहे पत्रात?
आपचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना चौकशीनंतर काही दिवसांपूर्वी सीबीआयकडून अटक झाली आहे. त्यांची अटक ही बेकायदेशीर असून कोणत्याही पुराव्यांशिवाय अटक करण्यात आल्याचा आरोप पत्रामध्ये करण्यात आलेला आहे. राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचं हे उत्तम उदाहरण आहे. खरं तर २०१४ मध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर देशात विरोधी पक्षांतील नेत्यांवर कारवाईचं प्रमाण वाढलं आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर मोठ्या प्रमाणात खोटे आरोप करण्यात आले, त्यांना अटक करण्यात आली. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यापैकी ज्या राजकीय नेत्यांनी भाजपात प्रवेश केला, त्यांच्यावर पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामध्ये इतर नेत्यांसह नारायण राणेंचाही समावेश आहे.