नवी मुंबई मध्ये 3 मजली इमारत कोसळली

दोघांची सुखरूप सुटका तर एकाचा शोध सुरू

नवी मुंबई मध्ये 3 मजली इमारत कोसळली

नवी मुंबई येथील बेलापूर सेक्टर १९ शहाबाज गावातील इंदिरा निवास ही तीन मजली इमारत कोसळली आहे. ही घटना आज सकाळी घडली.

पहाटेच बिल्डिंग हदरल्याची जाणीव होताच सर्व नागरिक बिल्डिंग बाहेर पडले.त्यामुळे मोठ अनर्थ टळला. ढिगाऱ्याखाली 3 जण अडकले होते. त्यातील दोघांना सुखरूप बाहेर काढले आहे तर एकाच अद्याप शोध रुर आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच, पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, पालिकेचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या बचावकार्य सुरू आहे.

ही इमारत २०१३ मध्ये बांधण्यात आली होती. कोसळलेल्या इमारतीमध्ये ३ गाळे आणि १७ फ्लॅट्स होते. पहाटे अचानक इमारतीला हादरा बसल्यानंतर नागरिक घाबरून घराबाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आतापर्यंत इमारतीत राहणारी ४० लोक आणि १३ मुलं होती. एक व्यक्ती बेपत्ता असून तिचा शोध सुरू आहे.

Rashtra Sanchar: