“एकनाथ शिंदेंसोबतचा एक मोठा गट अस्वस्थ, त्यामुळेच आमदार…”, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई | Sanjay Raut – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाबाबत (Shinde Group) मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचा (CM Eknath Shinde) एक मोठा गट अस्वस्थ आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसंच राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरही सडकून टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक मोठा गट अस्वस्थ असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. काही आमदार एकनाथ शिंदेंसोबत अयोध्येला गेले नव्हते. ही गडबड नेमकी चाललीये तरी काय? हे येत्या काही दिवसात समजेलच”, असा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे.

“मुख्यमंत्र्याच्या अयोध्या दौऱ्यात दर्शन घेण्यापेक्षा शक्तीप्रदर्शनाचा जास्त विषय होता. तुम्हाला शक्ती प्रदर्शन करण्यासाठी अयोध्या कशाला हवीये? तुम्ही तुमच्यासोबत जे गुंड होते त्यांना शुद्ध करायला शरयू नदीच्या किनारी घेऊन गेला होतात की काय?”, असा खोचक सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.

Sumitra nalawade: