मुंबई | Mumbai Kurla Fire – मुंबईच्या कुर्ला परिसरातील एका रहिवासी इमारतीला भीषण आग (Building Fire) लागलेली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे. तसंच या इमारतीमध्ये काही जण अडकल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
कुर्ला येथील नवीन टिळक परिसरातील एका इमारतीच्या 10 ते 11 व्या मजल्यावर ही आग लागली आहे. ही आग भीषण असून या इमारतीतून धुराचे लोट येत आहेत. आग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर इमारतीतील इतर लोकांना बाहेर काढण्यात आलं असून बचावकार्य सुरू आहे. तसंच घटनास्थळी स्थानिक पोलीस देखील दाखल झाले आहेत.
दरम्यान, अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून बचावकार्य सुरू असल्याचं सांगण्यात येतंय. पण इमारतीतील नागरिकांना बाहेर कसं काढलं जाणार याकडे लक्ष लागलेलं आहे. तर घरात किती लोकं अडकले आहेत यासंदर्भात माहिती समोर आली नसून काहीजण खिडकीत बसलेले आहेत.