महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपा आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : नवी मुंबईतील ऐरोलीचे भाजपा आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी एका महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

गणेश नाईक यांनी २०२१ मध्ये आपल्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप या महिलेने नाईक यांच्यावर केलेला आहे. मी गणेश नाईक यांच्यासोबत २७ वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहे आणि आम्हाला एक मुलगा देखील झालेला आहे, या मुलास त्याच्या वडिलांचं नाव दिलं जावं अशी मागणी मी त्यांच्याकडे केली होती. मात्र गणेश नाईक यांनी मला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप संबंधित महिलेने केलेला आहे.

आता या प्रकरणात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याशिवाय या महिलेकडून राज्य महिला आयोगाकडे देखील तक्रार करण्यात आलेली आहे. तर, या प्रकरणी गणेश नाईक यांनी स्वत:ची डीएनए चाचणी करून यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

Sumitra nalawade: