संजय राऊतांनी ‘तो’ फोटो केला ट्विट अन् गुन्हा झाला दाखल, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

सोलापूर | Sanjay Raut – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊतांच्या विरोधात सोलापूरमधील बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा एका अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

5 मार्च रोजी बार्शीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. दोन आरोपींनी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला होती. या हल्ल्यात पीडित मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अक्षय माने, नामदेव दळवी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मात्र, याबाबत संजय राऊतांनी ट्विट करताना पीडित मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक फोटो शेअर केला होता. त्यामुळे अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर झाली अशी तक्रार एका व्यक्तीनं बार्शी पोलिसात दाखल केली आहे. त्यामुळे काल (19 मार्च) रात्री अकरा वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला.

संजय राऊतांवर दाखल असलेल्या गुन्ह्यातील कलमांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे त्यांना आधी 41 ब प्रमाणे नोटीस दिली जाईल. तसंच राऊतांना थेट अटक होणार नसून त्यांच्या उत्तरानंतर पुढील कारवाई होईल अशी माहिती आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या ट्विटनंतर भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, “ओ सर्वज्ञानी..खोटी माहिती देत जनतेची दिशाभूल का करताय?? सगळ्या पुड्या संपल्या का तुमच्या आता महिलांवर आलात… या प्रकरणात दोन्ही आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करत अटक झाली. आताही आरोपी जेलमध्ये आहेत ही वस्तुस्थिती असताना का तुम्ही खोटी माहिती देताय? सगळ्यात महत्वाचं तुम्ही पीडितेचा फोटो कसा काय व्हायरल केलात?”, असे सवालही चित्रा वाघा यांनी संजय राऊतांना विचारले आहेत.

Sumitra nalawade: