अजबच! पुण्यात चांदणी चौकातील ‘शो’ची झाडे काका-काकूंनी पळवली; व्हिडीओ होतोय व्हायरल

पुणे | Pune News – पुण्यातील (Pune) चांदणी चौकात (Chandani Chowk) एक अजबच प्रकार घडला आहे. चांदणी चौकात दुभाजकावर ‘शो’ची झाडे ठेवण्यात आली होती. तर ही झाडे एका दाम्पत्यानं पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शोभेसाठी ठेवलेली ही झाडे पळवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

एका महिन्यापूर्वी चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी त्या ठिकाणी दुभाजकावर काही शोची झाडे ठेवण्यात आली होती. तर आता भरदिवसा एका दाम्पत्यानं कारमधून उतरत ती झाडे चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अनेक लोकांकडून हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी संताप व्यक्त केला आहे. अशी रोज झाडे चोरीला गेली तर एकही झाड राहणार नाही, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Sumitra nalawade: