धक्कादायक! पुण्यात एकाच कुटुंबातील पती – पत्नी सोबत मुलामुलींची आत्महत्या

पुणे : Pune News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Pune breaking news) एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (4 members of family suicide in mundhwa keshavnagar pune) मृतामध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. (a family suicide (dipak thote, Indu thote, in mundhva keshavnagar Pune police breaking news)

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ही घटना शुक्रवारी (Friday mundhva news) रात्री उशिरा घडली. मुंढवा परिसरात विषारी द्रव्य प्राशन करून एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि २ मुलांचा देखील समावेश आहे. त्यात २४ वर्षीय मुलगा आणि १७ वर्षाची मुलगी आहे.

दीपक थोटे (५५) आणि त्यांची पत्नी इंदू (४५), त्यांचा मुलगा (२४) आणि मुलगी (१७) त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आले.

शेअर मार्केटमध्ये मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Dnyaneshwar: