मुंबई | Nitin Desai Suicide – प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या आत्महत्येनं मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी हादरली आहे.
नितीन देसाई यांचं एनडी स्टुडिओ हे दुसर घर होतं. ते आत्महत्या करण्याच्या दोन दिवसांपूर्वी त्या स्टुडीओमध्येच होते. तसंच कालपर्यंत त्यांनी त्यांच्या टीमला प्रोजक्टबद्दल माहिती देखील दिली होती. पण आज सकाळी ते फोन उचलत नव्हते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी स्टुडिओच्या अधिकांऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यांनतर अधिकाऱ्यांनी दरवाजा तोडला तर नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं समजलं. तसंच नितीन देसाई यांनी आर्थिक समस्यांमुळे आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.
तर आता नितीन देसाईंनी एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं त्यावेळी नेमकं काय घडलं याबाबत त्यांचे जवळचे सहकारी दिलीप पिठवा यांनी माहिती दिली आहे. दिलीप पिठवा यांनी 1 ऑगस्टच्या रात्री नेमकं काय घडलं याबाबत सांगितलं आहे.
दिलीप पिठवा हे ETimes शी बोलताना म्हणाले की, त्यादिवशी दिल्लीहून आम्ही आलो आणि थेट स्टुडिओत गेलो होतो. त्यानंतर नितीन देसाई यांनी त्यांच्या अटेंडंटला आराम करायचा आहे असं सांगून बंगला उघडण्यास सांगितलं. थोडावेळ आराम केल्यानंतर देसाई हे बाहेर आले. त्यानंतर काही काम आहे असं सांगून ते दुसऱ्या मजल्यावर गेले आणि तिथे जाऊन त्यांनी आत्महत्या केली. तसंच देसाई हे आर्थिक अडचणीत होते त्यामुळे त्यांनी त्यांचं पवईचं कार्यालयही विकलं होतं, असंही दिलीप यांनी सांगितलं.
दरम्यान, नितीन देसाई हे प्रसिद्ध कला दिग्दर्शक असण्यासोबतच ते अभिनेते देखील होते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांचे सेट उभारले आहेत. हम दिल दे चुके सनम, लगान, जोधा अकबर, माचिस, देवदास अशा अनेक सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांचं देसाई यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. बॉलिवूड सोबतच त्यांचं मराठी सिनेसृष्टीतही मोठं नाव होतं.