बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी अखेर गजाआड

जुन्नर | विवाहेच्छुक तरुणांचा बनावट नवरीशी लग्न लावून मग नवरदेवाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यास नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. आरोपींनी 20 ते 22 तरुणांची बनावट लग्ने लावून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये तुकाराम भाऊराव मांगते (वय 23), बाळू भिकाजी काळे (वय 46), शिवाजी शंकर कुरकुटे (वय 64), बाळू गुलाब सर्वडे (वय 41) या चार जणांसह जयश्री काळू घोटाळे (वय 35) आणि मीरा बन्सी विसलकर (वय 39) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलिसांकडे काही दिवसांपूर्वी एकाच महिलेने दोन तरुणांचे लग्न लावून; तसेच त्यांची आर्थिक फसवणूक करून नवरी पळून गेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यावरून संबंधित महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या महिलेकडून आणखी काही जणांची फसवणूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून या प्रकरणाचा तपास केला असता सर्व आरोपी सापडले. त्यांनी 20 ते 22 जणांची बनावट लग्ने लावून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

Dnyaneshwar: