दुबईमध्ये साकारले हिंदू मंदिर

दुबई : दुबईमध्ये हिंदू मंदिर साकारले गेले आहे. दहा वर्षांपासून दुबईतील भारतीयांच्या मनातील स्वप्न आता सत्यात उतरले आहे. संयुक्त अरब अमिरातचे मिनिस्टर ऑफ टॉलरन्स शेख नाहयान बिन मुबारक यांच्या हस्ते या मंदिराचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. दसऱ्याच्या एक दिवस आधी या मंदिराचे अधिकृतरीत्या उद्‌घाटन करण्यात आले. हे भव्य मंदिर जेबेल अलीमधील अमिरातच्या कॉरिडोरमधल्या ऑफ टॉलरन्समध्ये बांधण्यात आले आहे. हे मंदिर जवळपास ७० हजार स्क्वेअर फूट क्षेत्रामध्ये आहे.

मंदिराच्या उद्‌घाटनावेळी २०० पेक्षा जास्त मान्यवर पाहुणे हजर होते. या मंदिराची विशेषता सांगायची झाल्यास या मंदिरात चर्च, गुरूद्वारासह अन्य धार्मिक स्थळेही आहेत. दुबईतील हे नवे मंदिर सर्वधर्मीयांसाठी एक आध्यात्मिक हब ठरते. मंदिरात हिंदू धर्माच्या १६ देवी-देवतांच्या मूर्तींसह एक ज्ञानकक्ष आणि अन्य धार्मिक क्रियांसाठी एक सामुदायिक केंद्रदेखील आहे. हे नवे मंदिर सकाळी ६.३० ते ८ या वेळात भाविकांसाठी खुले असणार आहे. या मंदिरात एका वेळी १००० ते १२०० भाविक एकत्र येऊ शकतात. मंदिरात क्यूआर कोडच्या माध्यमातून अपॉइंटमेंट सिस्टीमचा उपयोग करत जवळपास दोन लाख लोकांनी आतापर्यंत मंदिराचा दौरा केला आहे.

Sumitra nalawade: